बियाणी स्कूलमध्ये आंतराष्ट्रीय योग दिन साजरा

6aacc2ad c576 4a30 b7b4 a1c55c38efbe

भुसावळ (प्रतिनिधी) येथील बियाणी इंगजी व मराठी माध्यमिक विद्यालयात आज योग दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

 

विद्यार्थ्यांना प्रशिक्षक मनोज राऊत व त्यांचे सहकारी यांनी प्रात्यक्षिक करून दाखवत विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली. यावेळी शिक्षकांनीही योगासने केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सोफिया फ्रान्सिस यांनी योग प्रशिक्षक मनोज कुमार राऊत, प्रसाद आंबेकर, चित्रा देशपांडे, शीला शर्मा, यश आंबेकर यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन आभार मानले. तसेच संस्थाचालक मनोज बियाणी, संगीता बियाणी यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Protected Content