सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील ब्राम्हण हितवर्धिनीतर्फे बुधवार दि.१ जून रोजी बाबू सेठ यांच्या जाफर लॉनमध्ये विश्व ब्राम्हण दिवसानिमित्त समाजाचे संघटन दृढ होण्यासाठी मेळावा घेण्यात आला.
याकरिता सावदा, रावेर तालुका, यावल तालुका, मुक्ताईनगर तालुका, फैजपूर, जळगाव, भुसावळ, जामनेर तालुका, औरंगाबाद येथून बहुसंख्य प्रमाणात ब्राम्हण वर्ग उपस्थित होते.
सुरवातीस सदस्य मंजिरी कुळकर्णी व त्यांचे सहकारी यांनी श्री.गणेश वंदना व स्वागत गीताचा कार्यक्रम केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिप्रज्वलन करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला.
जळगाव ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष विलास कुळकर्णी, रावेर ब्राम्हण सभा अध्यक्ष श्री.मुजुमदार, भुसावळ ब्राम्हण सभा सचिव प्रकाश दलाल, भुसावळ येथील सुनील पाठक, पंडित वकील, औरंगाबाद ब्राम्हण महासंघा च्या विजया कुळकर्णी, जळगाव ब्राम्हण संघाच्या हेमलता कुळकर्णी, मुक्ताईनगर येथील अजय फडणवीस, विवरा येथील डॉ.वसंत कुळकर्णी. यावल येथील शाम शास्त्री गुरुजी व माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, नरेंद कुळकर्णी जामनेर, हे यावेळी उपस्थित होते.
“सामाजिक नियंत्रण, सामाजिक सुरक्षितता व सामाजिक आदान प्रदान हे संघटनेचे तीन नियम आहेत.” असे भुसावळ येथील प्रकाश दलाल यांनी सांगितले. त्यानंतर जळगाव ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष विलास कुळकर्णी यांनी “आम्ही मुला मुलींसाठी लवकरच व्यवसाय मार्गदर्शन मेळावे घेवून त्यांना जेवढी मदत होईल तेवढी करणार असल्याचे सांगितले.
मेळाव्यामध्ये पुरोहीतांसाठी अंत्येषटी कर्मासाठी चांगदेव, मेहूण, मुक्तानगर या तिर्थक्षेत्री धर्मशाळा बांधण्याचा ठराव मांडला गेला. जेणेकरून पुरोहित वर्गाला रोजगार मिळेल व समाज बांधवांना नाशिक किंवा ईतरत्र जावे लागणार नाही. यासाठी जळगाव ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष विलास कुळकर्णी यांनीसुद्धा मदत करण्याचे आश्वासन दिले. तर भूसावळ येथील पंडित यांनी ब्राम्हण समाजाच्या होतकरू व गरजू लोकांसाठी आर्थिक महामंडळ असावे अशी सूचना मांडली. तसेच रावेर येथील मुजुमदार सर यांनी समस्त ब्राम्हण समाजाने सर्व जातीधार्माना एकत्रित घेऊन पुढे वाटचाल करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. औरंगाबाद येथील विजया कुलकर्णी यांनी ब्राम्हण स्त्रियांनी समाज संघटनासाठी पुढे येवून कार्य करावे. असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी सावदा येथील ब्राम्हण हितवर्धिनी चे अध्यक्ष माधवी कानडे, सचिव राजेंद्र जोशी, कोशाध्यक्ष दत्तात्रय कानडे, श्रीकांत मटकरी, सानिका मटकरी, रसिका जोशी, अजय कुलकर्णी, मंजुषा कुलकर्णी, बापू कुलकर्णी, सौरभ कासवेकर. सुभाष कुलकर्णी, सुलभा कुलकर्णी, विलास कुलकर्णी, वनिता कुलकर्णी, दिनकर कुलकर्णी, शैला कुलकर्णी, सतीश जोशी, शंतनू गचके, मुन्ना कुलकर्णी, प्रदीप शरद कुलकर्णी, रितेश सकळकळे, निशा सकळकळे, कविता सकळकळे, सुदर्शन कानडे, दीपक कुलकर्णी, संतोष जोशी आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जोशी यांनी तर आभार प्रदर्शन सचिन सकळकळे यांनी केले.