तरूणावर चाकू हल्ला करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “दुकान चालवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील.” असे म्हणत एमआयडीसीतील व्ही-सेक्टर येथे चहा नाश्ताची गाडी लावणाऱ्या तरुणाला दोन जणांनी चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील दोन्ही संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

आज गुरूवार, दि. २ जून रोजी पोलिसांनी हि कारवाई केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी आदिक माहिती अशी की, “अयोध्या नगर येथील रहिवासी शिवनाथ आसाराम शिंदे (वय-३५) हा एमआयडीसीतील व्हि-सेक्टर येथे हेरम्स कंपनी जवळ नाश्ता तसेच चहा विक्री गाडी लावतो. बुधवार १ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहुल रामचंद्र बऱ्हाटे रा. रामेश्वर कॉलनी आणि गणेश अर्जुन कोळी रा. अयोध्या नगर हे दोघेही शिवनाथ शिंदे याच्या लोड गाडीजवळ आले. “दुकान चालवायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील” असे म्हणत त्यांनी शिवनाथ शिंदे यांच्याकडे पैशांची मागणी केली. शिंदे याने पैसे देण्यास नकार दिला असता त्याचा राग आल्याने गणेश कोळी याने शिवनाथ यास पकडून ठेवले. तर राहुल रामचंद्र बऱ्हाटे याने शिंदे यांच्यावर चाकूहल्ला करून जखमी करून पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन्ही हल्लेखोर हे भोलाणे येथे असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतात शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, किशोर पाटील, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, मुकेश पाटील यांनी संशयित आरोपी राहुल रामचंद्र बऱ्हाटे रा. रामेश्वर कॉलनी आणि  गणेश अर्जुन कोळी रा. अयोध्या नगर यांना गुरूवारी २ जून रोजी सकाळी १०.३० वाजता ताब्यात घेतले.

दोन्ही संशयित आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती व्ही.सी.जोशी यांनी दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे

Protected Content