भुसावळ येथे स्व.राजीव गांधी यांची जयंती साजरी

rgandhi jayanti

भुसावळ, प्रतिनिधी | भारताचे माजी पंतप्रधान व संगणक क्रांतीचे जनक भारतरत्न स्व.राजीव गांधी यांची ७५ वी जयंती आज (दि.२०) शहर काँग्रेस कमिटीतर्फे संत गाडगे महाराज वसतिगृह येथे साजरी करण्यात आली.

 

शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रविन्द्र निकम यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांना मिठाई व वही पेन वाटप करण्यात आले. या प्रसंगी शहर काँग्रस कमिटीचे उपाध्यक्ष जया फ्रांसिस, संतोष साळवे, विलास खरात, शैलेन्द्र नन्नवरे, युवक काँग्रेसचे इमरान खान, सलिम गवळी, संजय खडसे, अनवर तडवी, सचिन गायकवाड, मंगेश तायडे, मुकूंद नामदास, रवीन्द्र ढिवरे, जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, शाहरुख शेख, इरफान खान, तौसिफ शेख, महिला काँग्रसच्या हमिदा गवळी, जानी गवळी व वसतीगृहाचे अधिक्षक के.एम. साळुंके इत्यादी कार्यकर्ते हजर होते.

Protected Content