धरणगाव पालिकेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

ba98c0b6 28ed 414d 9b7d 065f0529f06d

 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगर परिषदतर्फ़े आज साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची ९९ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, यांनी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

धरणगाव नगर परिषदतर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमास सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, उपनगराध्यक्षा अंजली विसावे,मुख्याधिकारी जनार्दन पवार, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेनेचे गटनेते विनय भावे,माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी,पी. एम.पाटील, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन ,सुरेश महाजन, विलास महाजन, भागवत चौधरी,जितेंद्र धनगर, भाजपचे गटनेते कैलास माळी, शरद कंखरे, शहर राजेंद्र महाजन, उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री, शहर संघटक धिरेंद्र पुरभे, जयेश महाजन, राहुल रोकडे,अविनाश चौधरी, विनोद रोकडे, अरविंद चौधरी, मांतग समाजाचे पंच मंडळ, धरणगाव नगर पालिकाचे कर्मचारी,ओ.एस. संजय मिसर, दिपक चौधरी, युवराज मराठे, बाबु खा तडवी, कर निरीक्षक प्रणव पाटील,अनिल पाटील, संतोष चौधरी, किरण पाटील, प्रधानमंत्री आवास योजनेचे इंजिनिअर विक्रांत चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Protected Content