जळगाव (प्रतिनिधी) शहरातील हरिविठ्ठल नगरमधील न्यू जागृती मित्र मंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालयात आज आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो जळगाव माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून योगा दिवस साजरा करण्यात आला.
यानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सहाय्यक क्षेत्रीय प्रचारक अधिकारी उल्हास कोल्हे यांनी पटवून दिले. तसेच विद्यालयाचे क्रीडाशिक्षक किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगा प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून योगा करवून घेतला. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांनी योगा दिवसाचे महत्व सांगितले. तसेच रोज योगा करावा असे आवाहन केले. त्यानंतर उत्कृष्ट योगा करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो जळगाव या कार्यालयातील सहाय्यक क्षेत्रीय प्रचारक अधिकारी बापूराव पाटील, किरण कुमार, जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे संजय खैरनार, लता इखनकर, कृष्णा महाले, आशा पाटील, संगीता पाटील, दिनेश सोनवणे, विकास तायडे, शैलजा चौधरी व जगदीश शिंपी, प्रशांत मडके हे शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी,पालक तसेच छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मंगला महाजन, कविता पाटील,कल्पिता कोरे, पूजा बागुल, प्रशांत चौधरी, योगेश पवार, रुकसना तडवी, सागर भारुळे आदी शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.