चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिंवंत झाडाची कत्तल करून अवैध लाकूडची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील वाघळी चौफुलीवर आज पकडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, “चाळीसगाव तालुक्यातील वडाळा – वडाळी गावाकडून वाघळीकडे अवैध निबांच्या झाडाची कत्तल करून चोरटी वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना बुधवार, ८ जून रोजी मिळाली. त्यानुसार पथकाला रवाना करण्यात आले असता त्यावेळी वाघळी चौफुलीवर अवैध लाकूडची वाहतूक करताना चालकासह ट्रॅक्टर (एम.एच.१९ बीजी ५३७२) मिळून आला. त्यावरील चालकाला त्याचे नाव पोलिसांनी विचारले असता त्यांनी अलताफ अली नवाब अली (वय-४०) रा. वागळी असल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी ट्रॅक्टरासह चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. व पुढील कारवाईसाठी ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग यांना रिपोर्टद्वारे ताब्यात दिलेत.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कातकाडे व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली , पोना गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना शांताराम सिताराम पवार, पोना संदिप पाटील, पोना जयंत सपकाळे आदींनी केली आहे.