बनावट विदेशी मद्याचा साठा पकडला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील किनोद येथे बस स्थानकावरील यशपाल हॉटेलमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. त्यात ६६ हजार १३० रुपये किमतीच्या बनावट देशी, विदेशी दारुच्या ९३८ बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.

अशोक भिला सोनवणे (वय ४२, रा.चांदसर, ता.धरणगाव ह.मु.कांचन नगर, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील किनोद येथे बस स्थानकावरील यशपाल हॉटेलमध्ये बनावट मद्याची विक्री केली जात असून मद्याची साठवणूक करण्यात आल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा या हॉटेलवर छापा मारला असता देशी व विदेशी मद्याच्या ९३८ बाटल्या मिळून आल्या. ही दारु बनावट असल्याचे निष्पन्न झाले. विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक सी.एच.पाटील, दुय्यम निरीक्षक ए.एस.पाटील, एस.आर.शेलार, एस.बी.भगत, सतीश पाटील यांच्यासह कॉन्स्टेबल एन.व्ही.पाटील, ए.व्ही.गावंडे, एम. डी.पाटील, के.पी.सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Protected Content