अवैध गुरांची वाहतूक करणारा कंटेनर पकडला; वरणगाव पोलीसात गुन्हा (व्हिडीओ)

वरणगाव दत्तात्रय गुरव । भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा शिवारात कंटेनर अपघातग्रस्त झाल्यामुळे काहूरखेडा शिवारातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली असता या कंटेनरमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. एकाला अटक करण्यात आली असून वरणगाव पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

या कंटेनरमध्ये १५ ते २० जनावरे होती, त्यापैकी पाच ते सहा जनावरांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आज सकाळी आठ वाजेण्याच्या सुमारास मध्यप्रदेश मधून मालेगाव कडे गोवंश जातीच्या १५ ते २० जनावराला घेऊन जाणारा कंटेनर (डीएन ०१ डीबी ७०९८) हा काहूरखेडा शिवारामध्ये अपघात ग्रस्त झाला स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वरणगाव पोलिसांना तात्काळ माहिती दिली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.  सदर गोवंशाची जातीच्या जनावरांना जळगाव येथे गोशाळेमध्ये पाठवले गेले आहे यामध्ये ४ ते ५ जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. सदर घटनेचा पुढील तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत. 

Protected Content