गायी व वासरू चोरणारा अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील हॉटेल पालखीच्या मागील परिसरातून दोन गायी आणि वासरू चोरून नेणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. भाग ५ गुरनं०४२३/२०१९ भा.द.वि. कलम-३७९ प्रमाणे दिनांक ०३.०८.२०१९ रोजी १४.०८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील फिर्यादी- मन्सुर खान उर्फ बंटी इस्माईल खान वय-३१ रा. शिवाजी नगर भुसावळ यांच्या शहरातील पालखी हॉटेल मागे असणार्‍या गोठ्यातून दोन गायी आणि एक वासराची चोरी जावेद नजीर कुरेशी वय २५ रा.कुरेशी मोहला यावल याने केल्याने निष्पन्न झाले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच हा आरोपी फरार झालेला होता.

दरम्यान, याबाबत दिलीप भागवत यांना मिळलेल्या गुप्त बातमी वरून संशयित आरोपी जावेद नजीर कुरेशी याला यावल शहरातील खॉजा नगरी भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे.कॉ. सुनील जोशी, माणिक सपकाळे,शंकर पाटील,पो.ना.रविंद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर पो.कॉ. विकास सातदिवे,कुष्णा देशमुख,उमाकांत पाटील,ईश्‍वर भालेराव,प्रशांत परदेशी यांनी केली असून संबंधीत गुन्हाचा तपास पो.ना.रविंद्र बिर्‍हाडे करीत आहेत.

Protected Content