तापी फाऊंडेशन व राजे प्रतिष्ठानतर्फे मातीतल्या खेळांची जत्रा

deshi khel

चोपडा प्रतिनिधी । येथील राजे प्रतिष्ठान व तापी फाऊंडेशन निमगव्हाण (ता.चोपडा) यांच्या संयुक्त विद्यमाने पंकज विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मातीतल्या पारंपारिक खेळांची जत्रा आयोजित करण्यात आली.

या जत्रेचे उदघाटन विद्यालयाच्या प्रांगणावर मुख्याध्यापक एम.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी उदघाटक म्हणून व्याख्याते प्रा.संदीप भास्कर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणुन सी.एस.जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले. उदघाटन सत्रात तापी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक युगातील मोबाईल, टीव्ही यांत खेळले जाणारे खेळ हे शरीरास हानिकारक असतात तर मातीतले पारंपारिक खेळ जसे की विटी -दांडू, गोट्या-गोट्या, रस्सीखेच, लगोरी, भोवरा फिरविणे,टायर पळविणे हे शरीरासाठी कसे आरोग्यवर्धक असतात हे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विटी-दांडू, गोट्या-गोट्या, रस्सीखेच, लगोरी, भोवरा, टायर पळविणे आदी प्रकारचे खेळ खेळविण्यात आले. याचा मुलांनी मनसोक्तपणे खेळांचा आनंद लुटला त्यांच्या चेहर्‍यावरील हास्य आनंददायी होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.एम.जैस्वाल, प्रशांत पाटील, मनोज अहिरे, सुदर्शन चोले, आर.डी. पाटील, महेश गुर्जर आदी शिक्षक वृंदांसह राजे प्रतिष्ठानचे जिल्हा संघटक दिव्यांक सावंत, मंगेश पाटील, तापी फाऊंडेशनचे पदाधिकारी अनिल बाविस्कर, लिलाधर बाविस्कर, प्रदीप बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.

Protected Content