अग्नी-२ क्षेपणास्त्राची रात्रीची यशस्वी चाचणी

agni 2 missile

भुवनेश्‍वर वृत्तसंस्था । जमीनीवरून जमीनीवर मारा करणार्‍या अग्नी-२ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची शनिवारी रात्री यशस्वी चाचणी घेण्यात आली.

अग्नी-२ या क्षेपणास्त्राच्या दिवसाच्या चाचण्या आधीच यशस्वी झालेल्या आहेत. या अनुषंगाने शनिवारी रात्री ओदिशाच्या किनारपट्टीवरून चाचणी घेण्यात आली. ही चाचणीदेखील यशस्वी झाली आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता तब्बल दोन हजार किलोमीटर इतकी असून या चाचणीमुळे भारताचे लष्करी सामर्थ्य वाढणार असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान अग्नी-२ हे क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केलेले असून यात अत्याधुनीक दिशादर्शक प्रणाली बसविण्या आलेली असल्याने ते आपल्या लक्ष्याचा अचूकपणे वेध घेऊ शकते. हे क्षेपणास्त्र आधीच लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेले आहे.

Protected Content