वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर महावितरणचा ‘हाय अलर्ट’; वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन नियोजन

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने आपल्या यंत्रणेसाठी ‘हाय अलर्ट’ जाहीर केला असून, या कालावधीसह संपूर्ण पावसाळ्यासाठी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपत्कालीन नियोजन केले आहे. महावितरण अध्यक्षांकडून आढावा व निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय … Read more

बुलढाण्यात आरोग्य आणि कृषी योजनांवर भर; केंद्रीय मंत्री जाधव यांनी घेतली आढावा बैठक

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य विभाग आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी १६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक नियोजन समिती आणि खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे वेळेत पूर्ण … Read more

ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे – मुख्य अभियंता राजेश नाईक

बुलडाणा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उन्हाळ्याच्या कडाक्यात ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरण यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागनिहाय देखभाल-दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. याचदरम्यान वीजबिल वसुलीवर परिणाम झाल्याचे स्पष्ट करत, ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे. वाढत्या तापमानामुळे वीजेचा वापर … Read more

सामाजिक बांधिलकी! वाढदिवशी रविकांत तुपकर करणार शेतकऱ्यांसाठी उपोषण

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रविकांत तुपकर यांचा १३ मे रोजी वाढदिवस आहे, परंतु त्यांनी नेहमीप्रमाणेच कोणताही गाजावाजा न करता तो शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. तुपकर यांनी आजपर्यंत कधीही आपला वाढदिवस मोठ्या स्तरावर साजरा केला नाही. बॅनर, पोस्टरबाजी किंवा कोणताही जल्लोष टाळत ते हा दिवस नेहमीप्रमाणे सामाजिक कार्यासाठीच वापरतात. कार्यकर्त्यांनीही कोणतेही प्रदर्शन … Read more

मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांना गती द्या; मुख्य अभियंत्यांचे निर्देश

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन्हाच्या तडाख्यासोबतच अधूनमधून येणारा अवकाळी पाऊस आणि त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा, यासाठी महावितरणने हाती घेतलेल्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिले आहेत. मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी वीज बिल वसुली, वीज चोरी … Read more

‘लकी डिजिटल ग्राहक’ योजना : ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्यांना बक्षिसे

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महावितरणच्या ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’मुळे खामगाव शहरात वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ऑनलाइन व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी महावितरण कंपनीने ही योजना १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीसाठी सुरू केली असून, यामध्ये नोंदणीकृत डिजिटल ग्राहकांना भाग्यवान विजेता होण्याची संधी मिळत आहे. या योजनेअंतर्गत अशा ग्राहकांचा विचार केला … Read more

महावितरणच्या मानव संसाधन विभागाची धुरा राजेंद्र पवारांच्या हाती!

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) च्या संचालक (मानव संसाधन) पदाचा कार्यभार राजेंद्र पवार यांनी आज स्वीकारला. त्यांची या महत्त्वाच्या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. यापूर्वी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून यशस्वीरित्या कार्यरत होते. महावितरणमधील प्रदीर्घ, ३६ वर्षांच्या सेवेचा अनुभव असलेले नवनियुक्त संचालक (मानव संसाधन) राजेंद्र … Read more

खामगावात व्हेरिकोज व्हेन्स आणि थायरॉईड नोड्यूल तपासणी शिबिर!

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोटरी क्लब खामगाव आणि सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व्हेरिकोज व्हेन्स आणि थायरॉईड नोड्यूल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर येत्या रविवारी २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत होणार आहे. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायांमधील अशुद्ध रक्तवाहिन्या फुगणे. यामुळे पायांवर नसा ठळक दिसतात, … Read more

महावितरणकडून मान्सूनपूर्व तयारी : वीज वितरण यंत्रणेची दुरुस्ती

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एप्रिलपासून विदर्भात उष्णतेचा पारा चढत असताना, महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. उन्हाळ्यातील तीव्र उष्णता, अवकाळी वादळे आणि मान्सून काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी सर्व परिमंडलात वीज वितरण यंत्रणेच्या देखभालीस वेग देण्यात आला आहे. महावितरणच्या माहितीनुसार, झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर लोंबकळत असल्याने संभाव्य शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी … Read more

वीजग्राहकांनी या रकमेचा भरणा करावा, महावितरणचे आवाहन

बुलढाणा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता-२०२१ च्या विनियम १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. या सुरक्षा ठेवीची दरवर्षी पुनर्गणना होते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर, मागील एका वर्षातील ग्राहकांच्या वीज वापराच्या सरासरीनुसार आणि विनियम १३.११ नुसार ग्राहकांनी भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित दरानुसार (सध्या ६ टक्के) व्याज … Read more

प्रत्येक महिना मार्च समजून वीजबिल वसुली करा : मुख्य अभियंता नाईक

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वीज ही अत्यावशक गरज असूनही ग्राहक वीजबिल भरण्याला शेवटचे प्राधान्य देत असल्यामुळे परिमंडळाअंतर्गत घरगुती ,वाणिज्यिक,औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांकडे अजूनही मार्च २०२५ अखेर ११९ कोटीचे थकीत असलेले वीजबिल महावितरणची आर्थीक समस्या वाढविणारे आहे.त्यामुळे थकीत वीजबिल आणि एप्रिल महिन्याचे १२४ कोटी रूपयाचे चालू वीजबिल वसुल करण्यासाठी मार्च महिण्याप्रमाणेच धडक मोहिम राबवा, … Read more

बुलढाण्यात केस गळतीनंतर आता आली नख गळती !

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “बुलढाणा जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय?” असा सवाल सामान्य नागरिकांपासून ते स्थानिक प्रशासनापर्यंत सर्वत्र ऐकू येत आहे. काही दिवसांपूर्वी शेगाव तालुक्यात अचानक उद्भवलेल्या केसगळतीच्या विकाराने संपूर्ण जिल्हा हादरला होता. नागरिकांनी अनुभवलेल्या टक्कल पडण्याच्या समस्येमुळे प्रशासनाची पळापळ झाली होती आणि आरोग्य यंत्रणा सजग झाली होती. त्या घटनेला अजून अहवालही आलेले नाहीत, … Read more

संत नगरी शेगावात चैत्र नवरात्र उत्सवाला प्रारंभ

शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे चैत्र नवरात्र उत्सव आणि श्रीराम नवमी उत्सवाला रविवारपासून मंगलमय प्रारंभ झाला आहे. भाविकांच्या उत्साहाने आणि भक्तिरसाने भारावलेल्या वातावरणात मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.विशेष म्हणजे बुधवार, दिनांक 2 एप्रिल रोजी अध्यात्मिक रामायण स्वाहाकार यागास वेद घोषाच्या मंगलमय वातावरणात ब्रह्मवृंदांच्या हस्ते … Read more

महावितरणच्या ‘लकी डिजिटल ग्राहक’ योजनेचा पहिला लकी ड्रा ७ एप्रिलला

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महावितरणच्या ‘लकी डिजिटल ग्राहक’ योजनेचा पहिला लकी ड्रा ७ एप्रिल २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. या ड्रा अंतर्गत राज्यभरातील विजेत्यांना स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. योजनेनुसार, प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकासाठी ६५१ विजेत्यांना स्मार्टफोन मिळेल. तसेच, दुसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी दोन प्रमाणे १,३०२ … Read more

महावीर स्तंभाभोवती अतिक्रमण हटवा; जैन समाजाची मागणी

खामगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खामगाव शहरातील महावीर चौकात उभारलेला महावीर स्तंभ हा जैन समाजासाठी वंदनीय असून, त्याच्या पावित्र्यावर अनधिकृत बॅनर्स आणि अतिक्रमणांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्री सकल जैन संघ, खामगाव यांच्या वतीने मुख्याधिकारी श्री. प्रशांत शेळके यांना निवेदन सादर करण्यात आले. महावीर स्तंभ हा अहिंसा, शुद्धता आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक … Read more

वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांवर ‘दामिनी’ची कारवाई

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या बड्या ग्राहकांकडील विजेचे बिल वसुल करण्याची जबाबदारी महावितरणच्या दामिनीनी घेतली असून त्या कारवाईसाठी थेट ग्राहकांच्या दारात पोहचत आहे़त. चालू आर्थीक वर्षाचे केवळ ४ दिवस शिल्लक आहे आणि अजूनही परिमंडळातून १९० कोटी वसूल करण्यासाठी कारवाईला गती देण्यात आली असून प्रतिसाद न देणाऱ्या परिमंडळातील ८ हजार थकबाकीदार … Read more

विश्वासराव पाठक लिखित हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स’ पुस्तिकेचे मुख्यमंत्र्याचे हस्ते प्रकाशन

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्रातील ऊर्जा विभागाच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा देणाऱ्या ‘हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वासराव पाठक यांनी हे पुस्तक लिहिले असून, राज्याच्या आगामी २५ वर्षांच्या ऊर्जा धोरणाच्या दिशेने उचललेल्या पावलांचा हा दस्तऐवज आहे. ही पुस्तिका एमएसईबी … Read more

न्या. अनिल किलोरांनी जाणून घेतली महावितरणच्या योजनांची माहिती

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलडाणा शहरातील सहकार विद्या मंदिर येथे आयोजित विधी सेवा महाशिबिरात महावितरणच्या विविध योजनांचा जागर करण्यात आला. या शिबिरात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (नागपूर खंडपीठ) श्री. अनिल किलोर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा अध्यक्ष मा. न्यायमूर्ती श्रीमती मंजुषा देशपांडे यांनी महावितरणच्या माहिती स्टॉलला भेट दिली. त्यांनी महावितरणच्या योजनांची माहिती घेत … Read more

महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महावितरणला शनिवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे (सीबीआयपी) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून गौरविण्यात आले. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर उपस्थित होते. महावितरणच्या गौरवाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

शेतकरी आंदोलन नव्हे, सरकारचा चळवळ मोडण्याचा डाव – रविकांत तुपकर

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने सत्याग्रह करणे हा गुन्हा आहे का, असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उद्या, १९ मार्च रोजी मुंबईत शांततामय आंदोलन करत अरबी समुद्रात कर्जाचे सातबारे आणि सोयाबीन बुडवण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला आहे. मात्र, या आंदोलनाला खीळ घालण्यासाठी … Read more

Protected Content