जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरातून व्यापाराच्या दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, सुरेश कुमार गवालदास मेघानी (वय-६५, रा.केमिस्ट भवन, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे दाणाबाजार परिसरात रॉयल ड्रायफ्रूट्स व जनरल मर्चंट नावाचे दुकान आहे. दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात.
नेहमीप्रमाणे गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांनी दिवसभरातून आलेले दीड लाख रुपयांची रोकड एकत्र करून कापडी पिशवी ठेवली. त्यानंतर ती रोकड दुचाकी ( एमएच-१९, एयु ५१४३) मधील गाडीच्या डिक्कीत रोकड ठेवून घराकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी दाणाबाजार परिसरातील एका दुकानात जवळ ते लघुशंकेसाठी दुचाकी थांबविली. आतण जवळच्या दुकानाच्या आडोश्याला गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डिक्कीत ठेवलेले दीड लाख रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही, अखेर शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता सुरेशकुमार मेघानी यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रफुल्ल धांडे हे करीत आहे.