जिल्हा रूग्णालयात राडा करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आपत्कालीन कक्षामध्ये तीन जणांनी येऊन एकमेकांना शिवीगाळ करत झोंबाझोंबी करून वाद केला. यावेळी परिसरातील शांततेचा भंग केल्याप्रकरणी बुधवारी १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या अपत्कालीन कक्षामध्ये सोमवारी १४ एप्रिल रोजी मध्यरात्री १.३० वाजता उपचार घेत असताना संशय आरोपी राकेश प्रकाश पाटील (वय-२८, रा. अहुजा नगर), गौरव किशोर बागुल वय-२८, आणि गणेश शांताराम इंगळे (वय-२८ दोन्ही रा. आंबेडकर नगर) या तीन जणांनी आपत्कालीन कक्षामध्ये येऊन सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी यांनी धाव घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला[ परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महाविद्यालयात शांततेचा भंग केल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान या संदर्भात सहाय्यक फौजदार संजय महाजन यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी राकेश प्रकाश पाटील, गौरव किशोर बागुल आणि गणेश शांताराम इंगळे या तिघांनी विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सलीम तडवी हे करीत आहे.

Protected Content