‘तीन तलाक’ प्रकरणात पतीवर गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात माहेर आलेल्या विवाहितेला कौटुंबिक वादातून पतीने नोटीसद्वो तलाक बाबत तीन वेळेस नोटीस पाठविल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तीन तलाक दिल्याच्या कारणावरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुरूवारी ३१ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात माहेर असलेल्या रूफिना नाज अरशद अत्तार यांचा विवाह पुण्यातील हडपसर येथील अरशद हारून अत्तार यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पती व पत्नी यांच्यात कौटुंबिक वाद सुरू आहे. पती अरशद हारून अत्तार यांनी २२ जून ते २३ ऑगस्ट २०२३ पत्नी रूफिना नाज अरशद आत्तार यांना तीन वेळा तलाक नावाची नोटीस पाठविली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून पतीविरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती अरशद हारून अत्तार याच्या विरोधात गुरूवारी ३१ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मिलींद बळवंत करीत आहे.

Protected Content