अंतुर्ली खुर्द येथे हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त

कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील हातभट्टीचा अड्डा कासोदा पोलिसांनी कारवाई करून उद्ध्वस्त केला.

कासोदा पोलिस स्टेशन हद्दीतील अंतुर्ली खुर्दे येथे स.पो.नि.रविंद्र जाधव यांनी काल त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. नरेश ठाकरे, पो.कॉ.जितेश पाटील , पो.ना. शरद राजपूत, पो.कॉ इम्रान पठाण यांच्या टिमने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. यात तेथील पाण्याच्या टाकी जवळील शेतात रमेश प्रेमसिंग भिलाला ( पावरा ) याच्या गावठी हातभट्टी वर धाड टाकत २८० लिटर गावठी दारूसह प्लास्टिक ड्रम भरलेले कच्चे रसायन , ८४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. रमेश पावरा यांच्यावर महाराष्ट्र पोलीस दारूबंदी प्रॉव्हिशन कलम ६५ ( फ )नुसार कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाही ने स.पो.नि.रविंद्र जाधव यांच्या टिम सह कासोदा पोलीसांचे कौतुक होत आहे.

Protected Content