Home Cities जळगाव हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन

हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन

0
233


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज । येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ सुभाष भास्कर चौधरी (वय ७९ ) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या माध्यमातून एक मोठे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा चौधरी, मुलगा डॉ क्षितिज चौधरी, सून डॉ रिमा चौधरी, नातवंडे, मुलगी सौ राधिका, जावई उद्योजक राहुल चौधरी व नातवंडे आहेत. डॉ. चौधरी यांनी गेल्या ५० वर्षांपासून श्री हॉस्पिटलच्या माध्यमातुन रुग्ण सेवा केली. डॉ. चौधरी हे लेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते यासह बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे ते सिनेट सदस्य, महावीर सहकारी बँकेचे संचालक होते, विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

त्यांची अंतिम यात्रा उद्या दुपारी साडेतीन वाजता राहते घर, प्रताप नगर येथून निघून जैन हिल्स, शिरसोली रोड येथे जाईल व तिथे अंतिम संस्कार होतील.


Protected Content

Play sound