सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या उदघाटन १७ जुलै रोजी ख्वाजा नगर येथे नगरपालिका होल जवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम दि १७ जुलै पासून ते २१ जुलैपर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम समाज सेवक संयोजक सोहेल खान, सूरज परदेशी, मोईन खान, फरिद पत्रकार, युसूफ पत्रकार, निसार अहमद, साजिद पत्रकार, शेख कलीम, शेख कमरु, मोईन लाला, ताबिश खान, समीर शाह, रमजान मोमीन, साबिर तडवी, हुसेन बोहरी व अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य देऊन कार्यक्रमाला यशस्वी करण्यास सहकार्य दिला.
आमदार साहेबांच्या उपस्थितीत ७६ फार्म भरण्यात आले होते. तरी आजपर्यंत २१ जुलै रविवार पर्यंत १३० फार्म भरून गोर गरिबांच्या आर्थिक लुट होण्यापासून आमदार चंद्रकांत पाटलांनी गरिबांना एक प्रकारे आर्थिक मदतच ठरली आहे. ह्या कार्यक्रमाला अनेक समाजाच्या गोरगरीब महिलांनी उपस्थिती दिली तडवी समाज, मुस्लिम समाज, शाह बिरादरी, पिजारी समाज, मोमीन समाज, ज्यांना माहिती मिळाल्याप्रमाणे सर्व समाजाच्या महिलानी आपले आधार कार्ड, रेशन कार्ड, बॅंक पासबुकची झेरॉक्स,देऊन फार्म भरमदत केली व ह्या कार्यक्रमाला मा.आमदार चंद्रकांत पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी करण्यात आला व अनेक गोरगरीब महिला’नी मुक्ताईनगरचे लाडका आमदार उच्चारुन उपाधी देऊन त्या’ना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.