खान्देशपुत्र सी. आर. पाटलांकडे एकनाथ शिंदे यांच्या पाहुणचाराची जबाबदारी !

सूरत-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सहकारी आमदारांसह गुजरातमध्ये दाखल झाले असून ते सूरत येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असणारे भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांच्याकडे त्यांची जबाबदारी देण्यात आली असून शिंदे यांनी त्यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.

एकनाथ शिंदे हे ११ आमदारांसह रात्री पहिल्यांदा अहमदाबादमध्ये दाखल झाले. येथून ते आपल्या सहकार्‍यांसह सूरत येथील ला मेरेडीयन या हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. तर या हॉटेलच्या भोवती अतिशय कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. स्वत: गुजरातचे मुख्यमंत्री या स्थितीवर नजर ठेवून आहेत.

सूरत, नवसारी आदी भागात खान्देशमधील लोक मोठ्या संख्येने आहेत. यात नवसारी येथील खासदार हे सी. आर. पाटील हे असून ते मूळचे भुसावळ तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्या पाहुणचाराची जबाबदारी सोपविण्यात आली असून ते ऑपरेशन लोटसमध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती समोर आली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: