रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरांतील श्रीकृष्ण नगरमध्ये बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने २२ हजाराचे ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. या बाबत एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत वृत्त असे की रावेर शहरांतील श्रीकृष्ण नगरमध्ये प्रविण सिताराम महाजन यांचे बंद घराचे कुलुप गुरुवारी रात्री चोरट्यानी तोडून घरात प्रवेश केला. घरातील चांदीचे पैजन, चांदीच्या पाटल्या, चांदीचे जोडवे, सोन्याचे मनी, असा एकूण २२ हजाराचा एवज अज्ञात लंपास केले.
याबाबत प्रविण महाजन यांनी फिर्याद दिल्याने रावेर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्या विरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहेकॉ ईश्वर चव्हान पुढील तपास करीत आहे.