जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मू. जे महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद मंडळाचे उद्घाटन मा.राज शिरोडे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. राज शिरोडे हे आय. आय. टी मा.मंडी हिमाचल प्रदेश येथे वरिष्ठ संशोधन सहायक म्हणून कार्यरत आहेत.
कला शाखेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या व विविध व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. शिवाय काळाची पावले ओळखून स्वत: संधी निर्माण कराव्या लागतील. व्यावसायिक संधी कधी आपल्या दाराशी येऊन दार ठोठावण्याची वाट न बघता आपण स्वत: घेतलेल्या शिक्षणातून व नवीन कौशल्ये अवगत करून संधी निर्माण कराव्या लागतात. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी वादविवाद प्रमुख प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. तसेच मंडळाच्या भविष्यकालीन वाटचाली बद्दल वक्तव्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. करुणा सपकाळे या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक प्रा. आर.बी.ठाकरे होते.
याप्रसंगी राज शिरोडे यांनी केंद्रीय विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेबाबत तसेच भारतातील विविध नामवंत शैक्षणिक संस्था व त्यांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. कला शाखेतील विद्यार्थ्यांना भाषा, सामाजिक शास्त्रे, स्पर्धात्मक परीक्षा व संशोधन क्षेत्रातील विविध दालने याबद्दलही सांगितले. अभ्यास व कठोर मेहनत हाच यशाचा राजमार्ग असतो. असेही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. श्रध्दा पाटील यांनी केले. यावेळी प्रा. स्वाती बऱ्हाटे, प्रा. उमेश पाटील, प्रा. प्रसाद देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. लीना भारंबे, प्रा. छाया पाटील, प्रा. विनोद वैदकर, प्रा. वीणा भोळे, प्रा. ईशा वडोदकर,डॉ.श्रध्दा जोशी, प्रा. हेमंत पिंपळे, प्रा. स्वप्नील धांडे, प्रा. प्रिया सायखेडे तसेच चेतन वाणी, शिवा सपकाळे, श्री. ज्ञाने यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.