मुक्ताईनगरात युवासेनेतर्फे वाल्मीक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संतोष देखमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी युवासेना शिंदे गट मुक्ताईनगरच्या वतीने प्रवर्तन चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आरोपी वाल्मिक कराड याचा पुतळा जाळून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.

महाराष्ट्रातील कायदा आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी तसेच अशा विकृतींना कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आंदोलनाच्या वेळी उपस्थितांनी जोरदार घोषणा देत सरकार आणि न्यायसंस्थेने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

या आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, युवा सेना तालुकाप्रमुख जितेंद्र उर्फ गोलू मुऱ्हे, युवासेना उपतालुका प्रमुख मितेश पाटील, शिवसेना सोशल मिडिया जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नितीन कुमार जैन, चांगदेव सरपंच निखिल बोदडे, सुभाष माळी, अक्षय चौधरी, दीपक कोळी, निमखेडी सरपंच तायडे, संचालाल वाघ, विजय पाटील, मंगल घोगरे, प्रकाश गोसावी, अतुल पाटील, नरेंद्र गावंडे, विशाल नारखेडे, दीपक खेवलकर, अजय तळेले, वैभव पाटील, संतोष माळी, आकाश सापधरे, कृष्णा पाटील, संतोष माळी, अर्जुन भोई, स्वप्निल श्रीखंडे, डीगंबर चव्हाण आदींसह असंख्य युवा सैनिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

युवासेनेच्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी खबरदारी म्हणून अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांनी आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी केली. या आंदोलनाने संतोष देखमुख यांच्या हत्या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी जनमानसातून मोठा पाठिंबा मिळत आहे.

Protected Content