जळगाव प्रतिनिधी । आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयासमोर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांच्यावर आरोप लावणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा राष्ट्रवादीतर्फे निषेध करण्यात आला. पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर फडणवीस यांच्या प्रतिमेला चपलांचा प्रसाद देऊत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध आणि मुख्यमंत्री असतांना त्यांनी सत्तेचा गैरवापर केला, मंत्री नवाब मलिक यांच्यावर बेछुट आरोप केले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या वैयक्तिक आरोप केले आहे. यात फडणवीस यांनी ट्वीट च्या माध्यमातून खालच्या पातळीवर जावून आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. यांच्या निषेधार्थ आज जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा प्रसाद देवून पुतळ्याचे दहन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, विनोद देशमुख, मंगला पाटील, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील, अशोक पाटील, अल्पसंख्याक प्रदेश सचिव एजाज मलिक, वाय.एस. महाजन, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष मजार पठाण, युवती जिल्हाध्यक्षा कल्पीता पाटील, दिलीप महेश्वर, सुनिल माळी, अकील पटेल, मनोज वाणी, ललित बागुल, परेश कोल्हे, सलिम इनामदार, राहूल सोनवणे, अरविंद मानकरी, पुरूषोत्तम चौधरी, अनिल पवार, अशोक सोनवणे, रमेश बारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/385186046637378