बुलढाणा जिल्ह्यास वादळाचा फटका : वीज यंत्रणा दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात काल संध्याकाळच्या दरम्यान मलकापूर ,खामगाव,शेगाव,नांदुरा आणि संग्रामपूर भागात झालेल्या चक्रीवादळामुळे उध्वस्त झालेली वीज यंत्रणा पुर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा २४ तासांपासून युध्दस्तरावर कार्यरत असल्याने अनेक भागाचा वीज पुरवठा पुर्ववत करण्याला यश आला आहे.उर्वरीत भागाचा वीज पुरवठा दुरूस्तीसाठी कर्मचारी कार्यरत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळाचा वेग एवढा प्रचंड होता की,उच्चदाब व लघुदाबाचे शकडो वीज खांब जमिनदोस्त झाल्यामुळे मलकापूर आणि खामगाव विभागील २३ उपकेंद्रे ही अंधारात गेली होती.यामध्ये ३३ केव्ही सालीपुरा, ३३ केव्ही जांभूळधावा , ३३ केव्ही हरसोळा, ३३ के.व्ही. एपीडीआरपी, ३३ केव्ही दाताळा , ३३ केव्ही बेलाड, ३३ केव्ही दसरखेड, ३३ केव्ही नांदुरा,३३ केव्ही फुली, ३३ केव्ही महाळुंगे , ३३ केव्ही सुजातपुर , ३३ केव्ही नायगाव , ३३ केव्ही चांदुर, ३३ केव्ही मोताळा, ३३ केव्ही पोफळी , ३३ केव्ही किनोळा , ३३ केव्ही वाघजळ, ३३ केव्ही सावरगाव, ३३ केव्ही वडजी, ३३ केवी पिंपळगाव काळे, ३३ केव्ही आसलगाव,३३ केव्ही नारखेड आणि ३३ केव्ही निमगाव उपकेंद्राचा समावेश आहे.

कार्यकारी अभियंता रत्नदिप तायडे आणि मुळे यांच्या मार्गदर्शनात रात्रीतून सुरू केलेल्या कामामुळे ३३ केव्हीसालीपुरा,३३ केव्ही जांभूळधावा,३३ केव्ही दाताळा,३३ केव्ही नांदुरा,३३ फुली, ३३ केव्ही महाळुंगे,३३ केव्ही सुजातपुर,३३ केव्ही नायगाव,३३ केव्ही चांदुर,३३ केव्ही पोफळी आणि ३३ केव्ही किनोळा उपकेंद्राचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.

बुलडाणा विभागात ३३ केव्ही किनगाव आणि ३३ केव्ही साखरखेर्डा उपकेंद्राचा बंद पडलेला वीज पुरवठा रात्रीतून पुर्ववत करण्यात आला आहे.परंतू किरकोळ दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे.याशिवाय जिल्हयात खामगाव विभागातील खामगाव,शेगाव,संग्रामपूर परिसरात वादळाचा फटका बसल्याने शेकडो वीज खांब जमिनदोस्त झाले आहे.महावितरणच्या अविरत प्रयत्नाने शेगावचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.खामगावाचाही बराच भाग पुर्ववत झाला आहे. उर्वरीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी व कंत्राटदार एजन्सीचे कर्मचारी कार्यरत आहे.

बॅटरीच्या ऊजेडात दुरूस्ती कार्य :-

वादळ थांबताच दुरूस्ती कार्याला सुरूवात करण्यात आली. रात्रभर कर्मचाऱ्यांनी चक्क बॅटरीच्या प्रकाशात फॉल्ट शोधले आणि वीज खांबावर चढून दुरीस्तीचे काम करण्यात आले.

मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता फिल्डवर ;-

वादळामुळे विस्कळीत यंत्रणा पुर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदार एजंन्सीचे कर्मचारी मागील चोविस तासांपासून युध्दस्तरावर काम करत आहे. मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर व अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फिल्डवर आहे.

वीज ग्राहकांनी सहकार्य करावे ;- अधीक्षक अभियंता ,सुरेंद्र कटके

महावितरणची संपूर्ण यंत्रणा युध्दस्तराव कार्यरत आहे. वादळामुळे झालेले नुकसान प्रचंड आहे. शक्य त्या ठिकाणी महावितरणकडून बॅकफिडींगने वीज पपरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.तसेच प्रत्येक वीज वाहिनीचे ‘पोल टू पोल’ पेट्रोलिंग करून ,फॉल्ट शोधण्याचे काम युध्दस्तरावर कार्यरत आहे.त्यामुळे वीज ग्राहकांनी या काळात सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी केले आहे.

Protected Content