तुटलेली फांदी देतेय अपघातास आमंत्रण !

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । पंचक व लोणी गावांच्या दरम्यान महामार्गावरील एका वृक्षाची फांदी तुटून लोंबकळत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

याबाबत वृत्त असे की, अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्गावरील पंचक व लोणीच्या दरम्यान एका विशाल असे त् माहाकाय वृक्षाची फांदी तुटून त्याच वृक्षाला लटकलेली आहे. या महामार्गावरून दररोज अनेक लहान-मोठी वाहने ये-जा करत असतात. या तुटलेल्या फांदीमुळे कोणत्याही क्षणाला अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने ही फांदी या वृक्षावरून काढून टाकण्याची मागणी होत आहे.

Add Comment

Protected Content