रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पेट्रोल पंपाशी संबंधित स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी माप निरीक्षकाला ३२ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडल्याचा प्रकार समोर आला आहे. यात वजनमापे निरीक्षकाला अटक करण्यात आली असून जळगाव लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.
सुनिल रामदास खैरनार (वय-५६) रा. एसएमआयटी कॉलेज, जळगाव असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवाशी असून त्यांनी रावेर येथे ११ महिन्यांच्या करारावर पेट्रोलपंप भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतला आहे. या पेट्रोल पंपाच्या ४ झोनल मशीन स्टॅम्पिंग करून सदर स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त रावेर येथील वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक सुनिल खैरनार यांनी ३२ हजाराची मागणी केली.
त्यानुसार जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून ३२ हजाराची लाच स्विकारतांना निरीक्षक सुनिल खैरनार यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
यांनी केली कारवाई –
पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पो.नि. संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, सफौ दिनेशसिंग पाटील, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना जनार्धन चौधरी, किशोर महाजन, बाळु मराठे, सुनिल वानखेडे, पोकॉ महेश सोमवंशी, पोकॉ ईश्वर धनगर, पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ सचिन चाटे, पोकॉ प्रणेश ठाकुर, पोकॉ अमोल सुर्यवंशी या पथकाने केली.