Home Cities एरंडोल जवखेडे सीम येथील गुरांवर बिबट्याचा हल्ला

जवखेडे सीम येथील गुरांवर बिबट्याचा हल्ला

0
22

एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील जवखेडे सीम येथील संजय कैलास पाटील यांच्या जवखेडे सिम – गालापुर रस्त्यालगत शेतात बांधलेल्या पाच गुरांवर सोमवारी रात्रीच्या वेळेस बिबट्याने हल्ला चढविला. शेजारील कपाशीच्या शेतात ओढत नेऊन त्याने पाच गुरांचा फडशा पडला. 

या हल्ल्यात शेतकऱ्याचे जवळपास एक लाखाच्यावर नुकसान झालेले आहे. शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांनी संबंधित माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे कळविली असता त्यांनी वरिष्ठ अधिकारी वनरक्षक विजय माळी घटनास्थळी पाठवीले. विजय माळी यांनी पाऊलखुणा शोधल्या असता त्या बिबट्याच्याच असल्याचे आढळून आले.

फाशा पडलेल्या जनावरांची पशुवैद्यकीय डॉक्टर हेमंत नागणे यांनी वैद्यकीय तपासणी केली. ‘बिबट्यामुळे या प्राण्यांना जीव गमावला लागला.’ असे त्यांनी सांगितले; यामुळे जवखेडे सिम शिवारात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे


Protected Content

Play sound