ब्रेकिंग : भुसावळ दुहेरी हत्याकांडातील सहाव्या संशयित आरोपीला अटक

भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा जुन्या वादातून गोळीबार करून निर्घृण हत्या केली होती. या गुन्ह्यात यापूर्वी 5 जणांना अटक केली आहे तर सहावा आरोपीला वरणगाव येथून अटक करण्यात भुसावळ पोलिसांना यश आले आहे

भुसावळ येथे 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता जुन्या वादातून भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचे कारमधून जात असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणीच्या तपासामध्ये आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एका आरोपीकडून गावठी पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

शनिवार २२ जून रोजी दुपारी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वरणगाव शहरांमध्ये साक्री फाटा येथे संशयित आरोपी नितीन पथरोड याला सापळा रचून अटक केली. त्याला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान या हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम निरंतरपणे पोलिसांकडून सुरू आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय नेरकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, जावेद शाह, सचिन चौधरी आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Protected Content