ब्रेकींग : लॉजवर पोलिसांचा छापा: वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, तिघांना अटक!


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील विनायक प्लाझा हॉटेल व रेसिडेन्सी या लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा चाळीसगाव पोलिसांनी आज सिनेस्टाईल छापा टाकून पर्दाफाश केला. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. बनावट ग्राहक पाठवून, लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच पोलिसांनी तातडीने छापेमारी केली.

या धडक कारवाईत दोन महिला वेश्याव्यवसाय करताना रंगेहाथ पकडल्या गेल्या. पोलिसांनी लॉजचा व्यवस्थापक प्रसाद गवळी, मनोज गवळी यांच्यासह एका महिलेला तात्काळ अटक केली. तर, दुसऱ्या पीडित महिलेची सुटका करून तिला धुळे येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

बनावट ग्राहकांमार्फत रचलेल्या या कारवाईत पोलिसांनी लॉजच्या दोन वेगवेगळ्या रूममधून बनावट ग्राहकांसह दोन महिलांना ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर, पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. या पथकात पो.उ.नि. संदीप घुले, पो.हे.कॉ. योगेश बेलदार, विनोद पाटील, भूपेश वंजारी, पो.ना. नितीन आगोणे, पो.कॉ. आशुतोष सोनवणे, राकेश महाजन, पवन पाटील, महिला पोलीस मालती बच्छाव, मयुरी शेळके यांचा समावेश होता.