ब्रेकिंग : हॉटेलात वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा; दोन जण ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगावातील एमआयडीसी मधील सी-सेक्टर पोलिसांनी सागर लॉज या हॉटेलमध्ये सोमवारी ६ जानेवारी दुपारी ४ वाजता छापा टाकला. हॉटेलमध्ये काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत हॉटेलमधून पोलिसांनी ६ महिलांची सुटका केली तर २ जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी भागात जी-सेक्टरमधील सागर लॉजवर वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोमवार ६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलिसांनी सागर लॉजवर छापा टाकत ६ महिलांची सुटका तर २ जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Protected Content