Breaking News : शेततळ्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू; अंतुर्ली शिवारातील घटना !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील शेती शिवारातील शेततळ्यात बुडुन एका २१ वर्षीय व एका १४ वर्षीय तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच रुग्ण वाहिका चालक निळकंठ पाटील व सागर पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांना मृत घोषित केले.

अधिक माहिती अशी की, पदमसिंह भगवान पाटील (वय – २१ वर्ष) रा. अंतुर्ली बुद्रुक ता. पाचोरा व रविंद्र परभत कोळी (वय – १४ वर्ष) रा. पुनगाव ता. पाचोरा हे शेत मजुरी करुन आपल्या परिवारास आर्थिक पाठबळ देत होते. दरम्यान ८ मे रोजी सकाळी ८ वाजता पदमसिंग पाटील व रविंद्र कोळी हे कामावर गेले होते. खुप वेळ झाला तरी घरी परत न आल्याने ग्रामस्थांनी दोघांचा शोध सुरू केला असता सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अंतुर्ली शेत शिवारातील एका शेत तळ्यात दोघांचे मृतदेह आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांच्या मदतीने व रुग्णवाहिका चालक निळकंठ पाटील व सागर पाटील यांच्या साहाय्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी एकाच वेळी दोघांना मृत घोषित केले. पदमसिंग पाटील याचे पाश्चात्य वृद्ध आई, एक विवाहित बहिण व रविंद्र कोळी याचे पाश्चात्य आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दोघ तुरुणांचा मृत्यु शेत तळ्यात पाय घसरून पडल्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडुन व्यक्त करीत आहे.

Protected Content