Breaking News : कन्नड घाटात बसचे नियंत्रण सुटले; २० ते ३० प्रवाशी जखमी !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संभाजी नगरहून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १० ते १५ फुट खाली कोसळली. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटाच्या पायथ्याशी सोमवारी ११ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात २० ते ३० प्रवाशी जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेश राज्याची परिवहनची बस क्रमांक (एमपी १३ पी ३९५४) ही आज छत्रपती संभाजीनगर होऊन मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी कन्नड घाटातून निघाली. सोमवारी ११ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास कन्नड घाटाच्या पायथ्याजवळून जात असतांना बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस १० ते १५ फूट खाली गेली. या अपघातात २० ते ३० जण जखमी झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही, जखमींना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस ग्रामीण पोलीस व प्रशासन घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content