जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे तीन प्रकरणापैकी दोन प्रकरणांसाठी ३० हजारांची मागणी करत पहिल्या प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या जळगाव महापालिकेतील रचना विभागाचे रचना नगररचना सहाय्यक अधिकारी यांना रंगेहात पकडले आहे, ही कारवाई जळगाव लाच लुचपत विभागाने केली असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे जळगाव महापालिकेत खळबळ उडाली आहे. मनोज समाधान वन्नेरे व 34 राणा जळगाव असे अटक केलेल्या नगर रचना सहाय्यक अधिकाऱ्याचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण जळगाव महानगरपालिकेत मंजुरीसाठी टाकले होते. त्यांनी एकूण महापालिकेत ३ प्रकरणे दाखल केलेले आहेत, पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांनी सुरुवातीला पहिल्या प्रकरणात २१ हजारांची मागणी केली, त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रूपये देण्याचे ठरले, तसेच दुसऱ्या प्रकरणात १५ हजार रुपये महापालिका आयुक्त आणि सहाय्यक संचालक यांना देण्यासाठी मागितले. असे एकूण त्यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रादार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पथकाने सोमवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. दरम्यान पहिल्या प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव महापालिकेतील नगर रचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
यांनी केली कारवाई
पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोउनि सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर पाटील, राकेश दुसाने यांनी केली आहे.