ब्रेकींग : उसाचा पाचोळा जाळतांना वृद्ध शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  किन्ही शेत शिवारात उसाच्या मळ्यातील पाला पाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीत होरपळून हनुमंतखेडा येथील ८२ वर्षाच्या वृद्ध हात मजुराची मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हनुमंतखेडा ता. सोयगाव येथील रहिवाशी गोकुळ रामदास पवार (वय – ८२) हे आज १ मार्च रोजी किन्ही शिवारातील शेतात दुपारच्या सुमारास हात मजुरी करण्यासाठी गेले होते. दरम्यान उसाच्या मळ्यात पाला पाचोळा जास्त झाल्याने गोकुळ पवार यांनी पाला पाचोळा एकत्रित करुन जाळला असता आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग विझविण्याच्या प्रयत्नात गोकुळ पवार हेच आगीच्या विळख्यात सापडुन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती ग्रामस्थांना व घरच्या मंडळींना कळताच तात्काळ गोकुळ पवार यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी गोकुळ पवार यांना मृत घोषित केले. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली आहे. मयत गोकुळ पवार यांचे पाश्चात्य वृद्ध पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असुन गोकुळ पवार यांच्या दुर्दैवी निधनाने हनुमंतखेडा व किन्ही परिसरात शोककळा पसरली आहे.

Protected Content