धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिर येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय या ब्रह्मोत्सवात रविवार 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या कन्या गायिका कविता पौडवाल यांच्या भक्ती गीतांचा कार्यक्रम पार पडला. कविता पौडवाल यांच्या सुरेल आवाजातील भक्ती गीतांनी, भक्ती रसात श्रोते न्हावून निघाले.
पाळधी येथे साईबाबांचे प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी डिसेंबर महिन्यात सुनील झंवर, देवकीनंदन झंवर, नितीन लढ्ढा, शरद चंद्र कासट व श्री साई सेवा समिती चारीटेबल ट्रस्टच्या वतीने ब्रह्मोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही या ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ब्रह्मोत्सवात 24 डिसेंबर रोजी पंडित प्रेमप्रकाश दुबे यांचे संगीतमय सुंदर कांड कार्यक्रम झाला होता. आज रविवारी भजन संध्या एक शाम साई के नाम या अंतर्गत प्रसिद्ध गायिका कविता पौडवाल यांच्या भक्ती गीतांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कविता पौडवाल यांनी त्यांच्या सुरेल आवाजात वेगवेगळी भक्ती गीत सादर केली. या गीतांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळालं. भाविकांनी कविता पौडवाल यांच्या भक्ती गीतांना उत्स्फूर्त प्रतिसादही दिल्याचे यावेळी पाहायला मिळाला. या कार्यक्रमाला मुंबई येथील आजीचं घर ही संस्था चालवणारे तृतीयपंथी गौरी सावंत यांची उपस्थिती होती. गौरी सावंत यांनी कार्यक्रमात भावनिक शब्दात मनोगत व्यक्त करत उपस्थित आमचे लक्ष वेधले. महिला आणि पुरुष याप्रमाणे आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे आमच्याकडेही पाहण्याचा नागरिकांनी दृष्टिकोन बदलला पाहिजे तर सरकारनेही आम्हाला प्रत्येक शासकीय नोकरीच्या ठिकाणी संधी द्यावी अशी मागणी यावेळी गौरी सावंत यांनी मनोगत बोलताना व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. या ब्रह्मोत्सवामुळे पाळधी येथील साईबाबा मंदिराला यात्रेचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळालं