श्री. गो. से. हायस्कूल येथे राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था. संचलित श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली.

 

दि. २४ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ या कालावधीत पाचोरा तालुका महसूल प्रशासन व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी “ग्राहकांचे मूलभूत अधिकार”, “जागो ग्राहक जागो”, फसव्या जाहिराती या विषयावर चित्रकला स्पर्धा उत्साहात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्राहक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून चित्रकला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील. कलाशिक्षक प्रमोद पाटील, सुबोध कांतायन, ज्योती पाटील उपस्थित होते. स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक पुरवठा निरीक्षक अधिकारी पूनम थोरात, पुरवठा निरीक्षक अभिजीत येवले, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, पाचोरा तालुकाध्यक्ष चिंधू मोकल, शरद गीते यांचे मार्गदर्शन मिळाले.  सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार सुबोध कांतायन यांनी मानले.

Protected Content