भुसावळात फसवणूकीचा माल विकत घेतल्याप्रकरणी दोघांना अटक

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील तेली मंगल कार्यलय जवळ असलेले गुरुनानक इलेक्ट्रॉनिक दुकान मालकाची फसवणूक करत दुकानातून 53 हजार रुपये किमतीचा एसी व फ्रीज घेवून त्यांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला होता. भुसावळ बाजार पेठेत फसवूणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूकीचा माल विकत घेणाऱ्या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. 

अधिक माहिती अशी की, शहरातील तेली मंगल कार्यलय जवळ असलेले गुरुनानक इलेक्ट्रॉनिक दुकान मालक जगदीशसिंह छाबड़ा (रा.तेली मंगल कार्यलय) यांची ही फसवणूक झाली होती. या प्रकरणात २ रोजी गुन्हातील संशयित आरोपी शेख चांद शेख हमीद (वय-35, रा.दिनदयाल नगर, भुसावळ) याला शहरातील खड़का चौफुली भागातुन ताब्यात घेब्यात आले येऊन त्याचाही चौकशी केली असता त्याने फसवणूक करत सदरचे ए.सी व रेफीजनरेटर ज्ञानेश्वर (उर्फ नाना ) आनंदा लोखंडे व अशिक शेख अय्युब शेख यांना विकल्याचे कबुली दिली. त्यानुसार पथकाने  ३ रोजी रात्री सापळा रचून दोघांना अटक केली.  आज न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने दोघांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, निरीक्षक बाबासाहेब ठोबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक  कृष्णा भोये, पो.ना.रविंद्र बिऱ्हाडे, रवींद्र तायडे, उमाकांत पाटील,  पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, योगेश माळी यांच्या पथकाने केली.

 

Protected Content