भुसावळ येथे संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा

sant gadagebaba

 

भुसावळ प्रतिनिधी । येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या वतीने दि. ५ सप्टेंबर शिक्षकदिनानिमित्त शिक्षक सत्कार संमारंभ आयोजित करण्यात आला असून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांमधून “मिस फ्रेशर- ओजस पाथरवट” व “मिस्टर फ्रेशर- गौरव चौधरी” ची निवड करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही वर्षात इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉमवर आधारित उद्योगांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भारताच्या औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे स्थान वरच्या स्तरावर गेले आहे. देशासह परदेशात जाणाऱ्या इथल्या उत्पादनांनी मोठा नावलौकिक मिळविला आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारतामध्ये लघु व मध्यम उद्योगात चांगले होतकरू उद्योग बहरत असल्याची माहिती “भारतीय इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान” विभागाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी दिली. तसेच पुढे प्रा. सिंह म्हणाले, इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची वाढती बाजारपेठ रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करणारी ठरत आहे. साध्या बॅटरीपासून मोबाइल, टीव्ही, कम्प्युटर, लॅपटॉप, साऊंड सिस्टिम, इतर उत्पादने व असंख्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची निर्मिती भारताची वाटचाल इलेक्ट्रॉनिक हबच्या दिशेने करीत आहे.

भविष्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील नवीन उद्योग सुरु करायला देखील मोठा वाव आहे. अभियंते इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भुसावळमध्ये लघु व मध्यम उद्योगात चांगले होतकरु उद्योग उभारू शकतात. जळगाव जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील वापर व उत्पादनांचाही स्तर वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेतून दरवर्षी विद्यार्थी बाहेर पडतात. या सर्वांना संधी मिळू शकते, म्हणजे कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध आहेत. येत्या काळात सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जेवर आधारीत तसेच वीज बचत, रिमोट सेन्सिंग, सीसीटीव्ही व इतर अनेक क्षेत्रातील उद्योग यापुढील काळात वाढतील, अशी चिन्हे आहेत. त्यासाठी अधिक वाव मिळतो आहे. त्यातच केंद्र सरकारने या उद्योगाचा विकास करण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनीरिंगचे सदस्य प्रा.गजानन पाटील यांनी दिली.

यावेळी डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धिरज अग्रवाल, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.नीता नेमाडे, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दिपक खडसे, प्रा.निलेश निर्मल, प्रा. स्मिता चौधरी, प्रा.दिपक साकळे, प्रा.धिरज पाटील, नितीन पांगळे, विजय विसपुते, शत्रू मिश्रा, रोहित निर्मल यांच्यासह आदी उपस्थितीत होते. उद्या चांद्रयान मोहिमेच्या विविध माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल.

Protected Content