फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष व भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त धनाजी नाना महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रंथालयातील ग्रंथसंपदेचा पुरेपूर फायदा घेऊन वाचनाची आवड लावून घ्यावी. त्या माध्यमातून आपले ज्ञान समृद्ध करावे. मोबाईल मुळे आपणास शॉर्टकट जाण्याची सवय लागली आहे. मात्र ती बौद्धिक दृष्या सखोल ज्ञान समृद्ध करण्यासाठी पुरेशी ठरत नाही.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रंथालय विभाग प्रमुख ग्रंथपाल प्रा. आय. जी. गायकवाड यांनी प्रास्ताविकेत ग्रंथ व ग्रंथालय शास्त्राचे जनक यांची माहिती दिली.
यावेळी एनसीसीचे प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. आर. आर. राजपूत, प्रा. डॉ. मच्छिंद्र पाटील, प्रा. डॉ. पंकज सोनवणे यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथालय कर्मचारी सहर्ष चौधरी, सुरेखा सोनवणे, यामिनी चौधरी, फरीद तडवी यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार प्रा. उमाकांत पाटील यांनी मानले.