जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कांचन नगरात राहणाऱ्या व्यावसायिकाशी लग्न झालेल्या महिलेने धमकी देत पलायन करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सोमवारी ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता महिलेसह एकावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील कांचननगर परिसरात राजेश (नाव बदलेले) हे व्यावसायीक राहतात. त्यांचा २००७ मध्ये लग्न होवून घटस्फोट झाला होता. त्यानंतर २०२० मध्ये त्यांना प्रकाश गोपीलाल सोनी रा. बेळगाव या वयक्तीने त्याच्या लग्नासाठी चांगले स्थळ आणले आहे असे सांगितले. त्यानुसार जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी सारस्वत त्यांच्या मोबाईलवर काही मुलींचे फोटो पाठविले. त्यातील अर्पना नावाच्या मुलीचा फोटो राजेश यांना आवडला. त्यनंतर राजेश हे नातेवाईकांसह खासगी वाहनाने बेळगाव येथे गेले. तिथे मुलगी अर्पना चंद्रकांत नाईक (वय-३३) रा. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग हिला पाहिल्यानंतर लगेचच सायंकाळी वरमाळा टाकून विवाह केला होता. यासाठी राजेश यांनी मध्यस्थींना वेळावेळी रोखीन व ऑनलाईन एकुण २ लाख ६१ हजार रूपये दिले. अवघ्या दहा दिवसांच्या संसारानंतर मुलीने मुंबईला भावाला भेटण्याचा तगादा लावला. राजेश यांनी पत्नीला घेवून मुंबई येथे दादरला गेले. त्याठिकाणी राजेश हे तिकीट काढत असतांना तीच्यापत्नीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजेश यांनी थांबविले असता, त्या विवाहितेने राजेशशी वाद घालीत माझ्या मागे येवू नको नाहीतर चपलेने मारीन अशी धमकी देत शिवीगाळ करीत तेथून निघून गेली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याने राजेश यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून प्रकाश सोनी, फरार महिला अर्पणा चंद्रकांत नाईक यांच्याविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.