जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्यात अपयशी ठरलेल्या जळगाव पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने बुधवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजता पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करून समस्त मराठा समाज आणि महिलांचा मोठा अपमान केला होता. या संदर्भात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मंढे यांना अटक करण्याची मागणी केली होती. दरम्यान जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होवून दीड महिना झाला परंतू अद्यापपर्यंत जिल्हा पोलीस प्रशासनाकडून किरणकुमार बकाले यांना अटक करण्यात आलेली नाही. यासाठी गेल्या ६ दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. जिल्हा पोलीस प्रशासन हे किरण कुमार बकाले यांना अटक करण्यात अपयशी ठरलेले आहे. याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने बुधवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुस्त व गाढ गाळ झोपलेल्या व बकलेला पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, विनोद देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवी देशमुख, प्रमोद पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/5201225866655729