तीन कृषी कायदे मागे : लोकसंघर्ष मोर्चातर्फे टॉवर चौकात फटाके फोडून जल्लोष (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषि कायदे मागे घेतल्याची घोषणा केली आहे. आज शास्त्री टॉवर चौकात लोकसंघर्ष मोर्चातर्फे फटाके फोडून जल्लोष करून याचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सचिन धांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

सविस्तर माहिती अशी की, पंतप्रधान मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या कायद्यांना प्रखर विरोध करून रद्द करण्याची मागणी लोकसंघर्ष मोर्चाने केली होती. या संदर्भात संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून अनेकदा आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनात देशभरातील ५०० हून अधिक संघटना सहभागी झाली होती. एक वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर आज यश आले आहे. आज सकाळी मोदी सरकारने काळे कृषि कायदे रद्द केल्याने लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने शहरातील टॉवर चौकात बळीराजचे पूजन केले आणि फटाके फोडून जल्लोष करत पेढ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी लोक संघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, युवक जिल्हाध्यक्ष भरत कर्डीले, फारूख शेख, फारूख कादरी, प्रमोद पाटील, पियुष पाटील, अजय बारेला, कैलास सोनवणे, दामोदर भारंबे, मुकेश सावकारे, पराग घोरपडे, सुमित साळुंखे, विशाल देशमुख, सुशिल शिंदे आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/389086646340172

 

Protected Content