मोदींनी निवडणूकींपुर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करावी (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न झाल्याचे याची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आले.

महिला आघाडीने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात आवाहन केले होते की, भारतीय जनता पक्षाचे सरकार आले तर भारतातल्या गरीब लोकांच्या खात्यावर सरळ सर्वसाधारणपणे १५ ते २० लाख रूपये जमा करतील असे तोंडी आश्वासन प्रचारादरम्यान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून नागरिकांनी भाजपला मोठ्या संख्येने केंद्रात निवडून दिले. गेल्या ८ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्रीपद भूषवत आहे. परंतु गरीब जनतेच्या खात्यावर कोणत्याही प्रकारे काळ्या पैशाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. आश्वासनाच्या भूलथापांना आम्ही बळी पडलो आहोत, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या संदर्भात मुख्य निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी, सत्य समोर आणावे आणि पुढील कारवाई करावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना बुधवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर गायत्री सोनवणे, चारुलता सोनवणे, निर्मला बोरसे, आरती बोरसे, अलका माळीख, फरीद खान, डॉ. जुबेर शेख, अल्ताफ शेख, उमेश चौधरी, मनीषा दोंदे, शाईन पठाण यांच्यासह आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

 

Protected Content