मोठी बातमी : बोदवडमध्ये छापेमारी : एकाला उचलले

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात मुंबई येथील गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने छापा मारून एकाला अटक केल्याची कारवाई करण्यात आली आहे.

जळगाव शहरात काही दिवसांपूर्वीच एनआयएच्या पथकाने कारवाई करून पीएफआय संस्थेच्या एका पदाधिकार्‍याला ताब्यात घेतले होते. यानंतर रविवारी पहाटे बोदवड शहरातून मुंबई येथून आलेल्या पथकाने खलील नावाच्या इसमाला ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई नेमकी कोणत्या कारणावरून झाली याची माहिती मिळालेली नाही. तथापि, संबंधीत व्यक्ती हा मुंबईतल्या एका ड्रग्ज तस्करी प्रकरणातील फरारी आरोपी होता. तो बोदवड येथील आपल्या आप्ताच्या घरी काही दिवसांपासून वास्तव्याला होता. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मुंबई येथील सीआयडीच्या पथकाने त्याला अटक करून नेले आहे. त्याला जामठी रोडवर असणार्‍या शेतातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content