बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवघड गुन्हा आपल्या कौशल्याने उघडकीस आणल्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल गोपाळ तारूळकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात दि.१५/७/२०२२ रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.३२४/२०२२/भा.दं.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचे आरोपी हे अज्ञात असल्याने सदर चा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी मलकापूर पोलीस स्थानकात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी गोपाळ तारूळकर यांनी कौशल्य पणास लावले होते.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये स्वतः व आपले सहकारी तसेच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्य पणाला लावून तपास करून अज्ञात आरोपीची गोपनीय माहिती काढून ०७ आरोपी निष्पन्न करून त्यांच्याजवळून १२ गुन्ह्याची उकल करून गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या २२ दुचाकी वाहने जप्त करून १२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी योग्य ती मदत केली. यामळे े सदर गुन्ह्यातील आरोपी यांना वेळीच अटक केल्यामुळे पोलीसांची जनमाणसातील प्रतिमा उंचाविण्यासाठी मदत झाली त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी प्रशंसा पत्र देवून सन्मानित केले.
याप्रसंगी एसपी चावरीरा यांनी आपण भविष्यात देखील अशाचप्रकारची प्रशंसनीय कामगिरी करून महाराष्ट्र पोलीस दलाचे नव लौकिक कराल अशी अपेक्षा ठेवून त्यांना सन्मानित केले व पुढील कार्य कुशलतेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या पुरस्काराबद्दल गोपाळ तारूळकर यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.