बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तहसील कार्यालयात गोंधळ घालून कर्मचार्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, शुक्रवारी दोन जणांना तहसील कार्यालयात धुडगुस घातला. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी आपल्या दालनात असतांना प्रितम अवचित पालवे हे आसीफ शेख याच्यासोबत आले. यातल्या पालवे यांनी गोंधळ घालत त्यांना नोंदीबाबत विचारणा केली. याप्रसंगी आसीफ शेख यांना त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सांगितले. यानंतर या दोघांनी संध्या सूर्यवंशी यांच्यासोबत हुज्जत घातली.
दरम्यान, हा गोंधळ सुरू असतांना सचिन पाटील या कर्मचार्यांनी धाव घेत या दोघांना आवरण्याचा प्रयत्न केला. यावर या दोघांनी त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तहसील कार्यालयात धाव घेतल्यानंतर हा गोंधळ मिटला. या संदर्भात संध्या सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बोदवड पोलीस स्थानकात प्रितम अवचित पालवे आणि आसीफ शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.