बोदवड प्रतिनिधी। रस्त्यावर उभे असलेले कंटेनर अंधारात न दिल्यामुळे दुचाकीस्वाराने धडक दिल्यात यात त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना तालुक्यातील शेलवड जवळ घडली आहे.
तालुक्यातील शेलवड येथील मूळ रहिवासी व सध्या बोदवड शहरातील शारदा कॉलनीत निवास असलेले डॉ.पांडुरंग चावदस वाघ (वय ५०) हे आपल्या एमएच.१९-सीबी ५६९५ या क्रमांकाच्या दुचाकीने काल रात्री शेलवड येथून बोदवडकडे येत होते. दरम्यान मातोश्री हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला अंधारात एक कंटेनर उभे होते. त्याचा अंदाज न आल्याने डॉक्टरांची भरधाव वेगातील दुचाकी येऊन कंटेनरवर धडकली. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कोणतीही धोक्याची सूचना न लावता अंधारात रस्त्यावर कंटेनर उभे केल्याने हा अपघात शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी संबंधीत कंटेनर चालकाच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डॉ. पांडुरंग वाघ यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.