एलआयसी एजंटची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एलआयसी कार्यालयासमोर एलआयसी एजंटची २५ हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनकर तुकाराम बडगुजर (वय-४३) रा. सावखेडा रोड, पिंप्राळा हे एलआयसी एजंटचे काम करतात. १ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता शहरातील जिल्हापेठ परिसरातील भास्कर मार्केटमधील एलआयसी कार्यालयात आले. त्यावेळी कार्यालयाच्या बाहेर त्यांनी दुचाकी पार्किंग करून लावली होती. बडगुजर यांचे काम आटोपून सायंकाळी ५ वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता जागेवर दुचाकी मिळून आली नाही. दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू सापडून आली नाही. दिनकर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शेखर जोरी करीत आहे.

Protected Content