कोरोनामुळे दृष्टी मिळाली आणि दृष्टीकोनही ! : एका डॉक्टरचे उपचाराबाबतचे मनोगत

कोरोनाचा प्रतिकार करतांना अनेक डॉक्टर्सही बाधीत झाले आहेत. याच प्रकारे ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ, सोशल अ‍ॅक्टीव्हिस्ट आणि भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि. तु. पाटील हे कोरोनाचा उपचार करून नुकतेच घरी परतले आहेत. कोरोनाचा संसर्ग आणि याच्या उपचारात त्यांना आलेले अनुभव हे खास आपल्यासाठी सादर करत आहोत. कोरोनाने दुनियादारी शिकवली असे जेव्हा डॉ. पाटील म्हणतात तेव्हा आपल्याला आजच्या वास्तवाची भेदक जाणीव होते.
डॉ. नि. तु. पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. यातून बरे झाल्यानंतर त्यांनी अतिशय मर्मभेदी शब्दांमध्ये आपली अनुभूती व्यक्त केली आहे. आपल्यासाठी त्यांची पोस्ट जशीच्या तशी सादर करत आहोत.

शेवटी करोना माझ्या प्रेमात पडलाच….!

दि.22,23 (सोमवार, मंगळवारी )मार्चला थोडी कुणकुण लागत गेली,
वाटत होतं आला का नंबर…!
लागला आपला पण नंबर…!
आणि हो,
शेवटी करोना माझ्या प्रेमात पडलाच….!

मग आता काय…!
आधीचे 3 दिवसघरीच उपचार करून पाहू म्हटलं पण ताप उतरत नव्हता, मग भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आमचे मित्र डॉ.राहुलजी जावळे (सनराईज हॉस्पिटल)आणि माझे मित्र डॉ. महेश फिरके यांनी फबीफ्लू 400 mg आणि इतर सर्व मेडिसिन कोर्से लिहून दिला आणि मग 25 मार्च ला रात्री पहिला लोअडिंग dose घेण्यात आला आणि मग पुढील मात्रा दररोज सुरू झाली.
सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आमचे मित्र डॉ. जयंतजी धांडे यांनी फबीफ्लू 800mg उपलब्ध करुन दिल्याने गोळी संख्या कमी झाली.भिरुड कॉलनी मधील धन्वंतरी मेडिकलचे प्रसन्न पाटील,संदीप चौधरी, राजेश भंगाळे यांनी फटाफट सर्व औषधी उपलब्ध करुन दिली,शिवाय आई आणि सौ. रेणुका याची पण औषधी वेळेवर उपलब्ध करुन दिल्याने वेळ वाचत गेला. घरपोच औषधी येत होती.

फरक पडत गेला,सर्व व्हाईटल व्यवस्थित काम करत होते, फक्त थकवा जाणवत होता आणि तोंडाची चव दूर पळाली होती.सर्व गोड गोड वाटत होतं.जेवणं तर नावालाच होते, नारळ पाणी फक्त सहारा…!चहा घेण्याची तर इच्छाच मरण पावली.

दि.29 मार्चला मी डॉ. राहूल जावळे यांच्याकडे तपासणी करण्यासाठी गेलो,त्यांनी सर्व व्यवस्थित आहे, काही गोळ्या बदलवून दिल्या आणि रक्ताचे घटक तपासण्यास सांगितले शिवाय Chest HRCT करून घ्या म्हणून सांगितले….!

सिटी स्कॉर, कहाणी मे ट्विस्ट आणि घटस्फोट तयारी ..!

30 मार्च ला Chest HRCT केल्यावर 12/25 असा चकित करणारा कॉविड स्कॉर आला. माझा त्यावर विश्वास बसत नव्हता,आमचे मित्र डॉ राहुल जावळे म्हणाले, ते आपण नंतर पाहू आधी, तुम्ही कुठेही भरती व्हा….!

वेळेचं गांभीर्य समजत,मी भुसावळ मधील सरकारी ट्रुमा केअर सेन्टर येथील मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. मयूर नितीन चौधरी यांनी फोन केला,त्यांनी लगेच बेड उपलब्ध करून दिला,विशेष म्हणजे मला कुठल्याही बाह्य ऑक्सिजन प्रणालीची गरज नव्हती,95 ते 97% अशी ऑक्सिजन पातळी कायम होती.!अनायासे ट्रुमा सेन्टर ला डॉ. वीरेंद्र झांबरे यांचे आगमन झाले त्यांनी माझी परिस्थिती पाहून लगेच मला I.V लाइन लाउन दिली,आणि पहिला लोडिंग डोस “इंज. रेमडीसिव्हर चा गेला आणि इतर…!
30 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत सर्व इंजेक्शन झाले, आणि आज आता सुटी घेउन घरी आलो.रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. मयूर नितीन चौधरी,डॉ. विक्रांत सोनार,डॉ. शुभांगी पाटील,डॉ.भालचंद्र चाकूरकर, परीचारिका शोभा सोनवणे,रेखा पाटील,सुनीता कसबे,विद्या तायडे आणि इतर सर्व स्टाफ, किरण सोनवणे, एलियास, गणेश,केदारे,महेश सोनवणे,पंकज कोलते,दिपक भिरुड, ह्या सर्व स्टाफच्या मेहनतीने मी करोनाशी दोन हात करण्यास समर्थ झालो आणि घटस्फोट पूर्ण झाला.

सर्वांकडून तब्बेतबद्दल विचारणा…!

ज्या दिवशी ट्रुमा केअर ला भरती झाली त्याच दिवशी मा. वैद्यकीय मंत्री मा.आ.श्री.गिरीशजी महाजन यांचा फोन,मा आ. संजयजी सावकारे यांचं दर एकदिवसआड फोन, डॉ. निलेश चौधरी(गिरीजा हॉस्पिटल),डॉ. मनोज वारके(यावल),दिव्यमराठीचे भुसावळ विभाग प्रमुख हेमंत जोशी,रवींद्र निमानी, नगरसेवक पिंटू कोठारी,आमचे मित्र राहुल सोनटक्के यांनी रुग्णालयात भरती झाल्यावर विरंगुळा म्हणून त्यांनचा लॅपटॉप माझ्याकडे ठेवला होता,डॉ.राजेंद्र फिरके, डॉ. निखिल चौधरी, जळगाव, अमित असोदेकर, मंगेश पाटील,संदीप सुरवाडे, शिशिर जावळे, नगरसेवक किरणजी कोलते,बबलूभाऊ बऱटे,सुधाकर जावळे, महेश सोनवणे, डॉ. विनोद चौधरी,जितू पाटील,रितेश पाटील जळगाव आदी आदी फोन आलेत….!

करोनाला हरवण्यापेक्षा दुःख मुलांना जवळ न घेण्याचे..!

जवळपास 13 दिवस माझ्या मोठं अणि छोटे पाटील यांपासून दूर होतो. त्यांना 13 दिवस हात पण लावला नाही,छोटा जवळ यायचा तर त्याला मी दूर सारायचो.
एक वेळ करोना सहन करू पण परिवरपासून दूर राहणे, अवघड आहे. संपूर्ण संक्रमित काळात संपूर्ण परिवार पाठीशी भक्कमपणे उभा होता, म्हणून मी पण तग धरून होतो.माझा वासुदेव नेत्रालयातील सर्व स्टाफ कपिल,दीपक,निलेश, आमीन,मझर आदी सर्व भक्कमपणे उभा होता.

करोना मुळे नव आयुष्याची सोनेरी पहाट…!

आत्तापर्यंत जगणे हे फक्त नावालाच जगणं होतं.शरीर हीच आरोग्य संपदा आहे,हे माहिती असून देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होतं.संसाराकडे लक्ष देत असताना स्वकडे कधी दुर्लक्ष होत लक्षात येत नाही.त्यामुळे शारीरिक मेहनत शून्य….!आणि ह्या जीवघेण्या आजारात नशीब बलवत्तर म्हणून मोठं मोठं औषधे ,स्टिरॉइड आदी सहन करू शकलो.पण आता मात्र 10,12 दिवस गेले की व्यवस्थित व्यायामाची शारीरिक सवय लावायची,ध्यानधारणा करायची,जास्त जीव काढ्या कारभार करायचा नाही,जमल्यास संध्याकाळी मोबाईल बंद आणि फक्त परिवार वेळ बस…!शेवटी परिवाराच पाठीशी उभा राहतो.त्यामुळे परिवाराला वेळ द्या.

करोनामुळे दुनियादारी शिकलो…!

मित्र आनंदात असेल तर निमंत्रणाची वाट पाहावी, आणि दुःखात असेल तर लगेच भेट देण्यासाठी जावे, असा आघात आहे. पण मी मात्र याठिकाणी संपूर्ण उघडा पडलो.ज्यांच्यासाठी आपण तडक जळगाव, वरणगाव आदी ठिकाणी जायचो,तेव्हा करोना आहे, ऊन आहे, काही काही पाहिले नाही पण त्यांना अजूनही हे अंतर कापता आले नाही.आभासी दुनियावर ,सोशल मीडियावर भले 5000 मित्र परिवार असेल पण गरज असतांना फक्त हातावर मोजण्याइतके उभे राहतात.आता त्यांच्यासाठी जगायचे आहे. तीच आपली दुनिया…!
सर्वांना आपलं आपलं म्हणून उपयोग नाही,वेळ आल्यावर सर्व दाखवुन देतात.काहीं फ़क्त गरज म्हणून मैत्री हवी असते, काहींना काही फायदा दिसतो म्हणून हवी असते, काही फक्त हाताशी ठेवतात पण आता मात्र करोना मुळे दृष्टी आणि दृष्टीकोन दोन्ही मिळाले आहे.
आता पुढील वाटचालीत फक्त मोजक्या मित्रांचा समावेश असेल आणि भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रुमा केअर सेन्टर मधील सर्व जिवाभावाच्या स्टाफ साठी,त्याठिकाणी अजूनही चांगली रुग्ण सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहील,यानिमित्ताने मी आपणास शब्द देतो…!

बाकी दुनियादारी गेली….. !

काय गायब झाले आहे याचा विचार न करता काय शिल्लक आहे यावर भर देउ या,

” शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई,
दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही…”

दि.22 मार्च ते 3 एप्रिल 2021(13 दिवस)

डॉ. नि. तु.पाटील
उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक ,
वैद्यकीय आघाडी,भारतीय जनता पार्टी ,
महाराष्ट्र राज्य

Protected Content